Jalgaon News : बांगलादेशींचा मुद्दा पुन्हा चर्चेत ; जळगावात एक धक्कादायक प्रकार उघड, पोलिसात गुन्हा दाखल

---Advertisement---

 

Jalgaon News : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्या घरात नुकताच एकाने चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी अभिनेता खान समोर आल्याने त्याने त्यांच्यावर हल्ला करून पसार झाला. यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता तो बांगलादेशी निघाला. दरम्यान, या घटनेनंतर बांगलादेशींचा मुद्दा चर्चेत आला असून, बांगलादेशातील कित्येक नागरिक राज्यातील अनेक भागात हात-पाय पसरवले असल्याचे अनेकदा समोर आले आहे. अशातच पुन्हा जळगावातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

जळगावच्या एमआयडीसी परिसरातील हॉटेल तारामध्ये काही बांगलादेशी महिलांकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात होता. याबाबत पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांना माहिती मिळाली. त्यांनी एएचटीयू पथकास सूचना दिल्या. त्यानुसार त्यांनी बुधवारी सायंकाळी हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवला असता, या देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश झाला.

या कारवाईत हॉटेल मालकासह पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर एक अन्य व दोन बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन महिला बांगलादेशी

दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या तिन्ही महिलांकडे कोल्हापूरचा पत्ता असलेले आधार कार्ड पोलिसांना सापडले. मात्र, त्यांना ”भारताचे राष्ट्रगीत आणि मराठी व हिंदी बोलता येत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता तीन महिलांपैकी दोन महिलांनी आपण बांगलादेशी असल्याचे कबूल केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---