---Advertisement---
जळगाव : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती. गोपीचंद पडळकरांच्या या विधानावरुन शरद पवार गट आक्रमक झाला आहे. या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा कार्यालयासमारो जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करुन आ. पडळकर यांचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेशभूषा साकारून श्वानाला गोपीचंद पडळकर यांचं पोस्टर लावून निषेध व्यक्त करण्यात आला आहे. याप्रसंगी गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरवरील त्यांच्या फोटोवर लाल रंगाने फुली मारून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आ. पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. यावेळी काळ्या पेनच्या शाहीने आ. पडळकर यांच्या फोटोने रेषा मारून त्यांचे तोंड काळे करण्यात आले.
या आंदोलनात आंदोलनाला प्रदेश सचिव रवींद्र भैयासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष प्रमोद पांडुरंग पाटील, महानगराध्यक्ष एजाज मलिक, महानगर कार्याध्यक्ष संग्राम सूर्यवंशी, महिला अध्यक्ष मंगला पाटील, कल्पिता पाटील, युवक अध्यक्ष रिकु चौधरी, शोभा सोनवणे, त्याचबरोबर माजी नगरसेवक सुनील माळी,राजीव मोरे, सरचिटणीस महाजन सर, विद्यार्थी अध्यक्ष गौरव वाणी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.









