अजित पवार यांच्या ताफ्यासमोर कांदा आणि टोमॅटो फेकून निषेध

नाशिक : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नाशिक जिल्हा दौ-यावर आहेत. दरम्यान अजित पवार हे कळवण येथे जात असताना दरम्यान वणी येथे कांदा -टोमॅटो उत्पादकांनी अजित पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ताफ्यासमोर टोमॅटो व कांदा फेकून निषेध नोंदवला. यावेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले. प्रसंगी कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजीही केली.

आज उपमुख्यमंत्री अजित पवार एक दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. ते सकाळी ओझर विमानतळावर दाखल झाले. त्यानंतर दिंडोरीकडे जात असताना ठिकठिकाणी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. दरम्यान, कळवणकडे जात असताना शेतकऱ्यांनी ताफ्यासमोर कांदे आणि टोमॅटो फेकून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आले. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतले.

मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोला (Tomato Rate) उच्चांकी भाव मिळत होता. त्यावेळी समाधान होते. मात्र सद्यस्थितीत टोमॅटो दहा रुपये किलोने विकला जात असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आंदोलन करण्यात येत असून दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारासमोर टोमॅटो रस्त्यावर फेकले. यावेळी संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणांचा निषेध नोंदवला.

केंद्राने कांद्यावर निर्यात शुल्क लागू केल्याने कांद्याचे भाव पडले आहेत. मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोला (Tomato Rate) उच्चांकी भाव मिळत होता. मात्र सद्यस्थितीत टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावा लागत असल्याने शेतकरी तीव्र संताप व्यक्त करत आहेत. तसेच सरकरच्या शेतकरी विरोध धोरणाचा निषेध करण्यात आले. शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे नाशिक- कळवण रस्त्यावरील दिंडोरी बाजार समितीच्या आवारात काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.