Pune Crime News : रात्री अचानक आला आवाज अन् पत्नीचं फुटलं बिंग, पुढे काय झालं?

#image_title

पुणे ।  पिंपरी-चिंचवड हे दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांसाठी चर्चेत राहू लागले असून, चाकण परिसरात असलेल्या सावरदरी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेसह तिच्या प्रियकराने पतीच्या खुनाचा प्रयत्न केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. धारदार शस्त्राने सपासप वार करून पतीला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सुदैवाने पती बचावला असून,  त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर चाकण पोलिसांनी तातडीने कारवाई करत पत्नी अंकिता अजयकुमार सिंग आणि तिचा प्रियकर सचिनकुमार उपेंद्र राजभर यांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार सिंग हे चाकण औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत काम करतात. त्यांची पत्नी अंकिता हिचे लग्नाआधीपासूनच सचिनकुमारसोबत प्रेमसंबंध होते. अजयकुमारला हे समजल्यानंतर त्याने पत्नीला त्याच्यासोबत बोलू नको, असे म्हटले होते. मात्र, पत्नीने त्याकडे दुर्लक्ष केले.

हेही वाचा :  कोण जिंकणार भारत की पाकिस्तान? आयआयटी बाबाची अजब भविष्यवाणी

रविवारी रात्री सर्वजण झोपेत असताना, अजयकुमार यांना घरात कुणीतरी बोलत असल्याचा आवाज आला. संशय आल्याने त्यांनी रूममध्ये पाहिले असता सचिनकुमार (प्रियकर) तिथे असल्याचे दिसून आले. अचानक रंगेहात पकडले गेल्याने अंकिता आणि सचिनकुमार घाबरले. अजयकुमार यांनी प्रियकराला घरात कसा आला याचा जाब विचारताच, दोघांनी  त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली.

यानंतर, सचिनकुमारने धारदार भाजी कापण्याच्या चाकूने अजयकुमार यांच्या छातीवर आणि पोटावर सपासप वार केले. प्राणघातक हल्ला होत असल्याचे लक्षात येताच, अजयकुमार यांनी शिताफीने त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली आणि घराबाहेर धाव घेतली.

हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा

अजयकुमार यांच्या आक्रोशाने शेजारी घराबाहेर आले. त्यांनी परिस्थिती ओळखून तत्काळ घराच्या बाहेरून कडी लावली आणि पोलिसांना माहिती दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी अंकिता व सचिनकुमारला अटक केली.

पोलिस तपास सुरू

पतीच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.