लागा तयारीला… आरोग्य विभाग पुणे अंतर्गत मोठी भरती

तरुण भारत लाईव्ह । मुंबई : पुणे सार्वजनिक आरोग्य विभागात नोकरभरती करण्यात येणार असून क गटातील पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागातील ‘क’ गटातील विविध पदांसाठी १४८९ जागा भरण्यात येणार आहेत. या नोकरभरतीची प्रक्रिया लवकरच सुरु होणार असून याबाबतची माहिती शासनाच्या अधिकृत वेबसाइट प्रसृत करण्यात येणार आहे.

दरम्यान, नोकरभरती प्रक्रियेबद्दलची माहिती मिळविण्याकरिता शासनाच्या https://arogya.maharashtra.gov.in/https://nrhm.maharashtra.gov.in/ वेबसाईटला भेट द्या. तसेच, नोकरभरतीसाठी आवश्यक निकष तसेच आवश्यक अर्हता, आरक्षण, वयोमर्यादा, शुल्क, निवडीची सर्वधारण प्रक्रिया इत्यादी बाबतचा सविस्तर तपशिल लवकरच प्रकाशित केला जाईल.प्रस्तूत जाहिरातमध्ये भरती संदर्भातील कार्यालय निहाय आणि पदानिहाय संक्षिप्त तपशिल दिला आहे.