Pune Divorce Case : पुण्यात घटस्फोटाचं एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. मतभेद असलेल्या जोडप्यानं घटस्फोट घेण्यासाठी कोर्टाची पायरी चढली. परंतु या जोडप्याची चर्चा पत्नीने केलेल्या मागणीमुळे होत आहे. तुला घटस्फोट हवा तर मी दिलेला आफ्रिकन पोपट परत कर अशी मागणी पत्नीने नवऱ्याकडे केलीय.
काय आहे हा प्रकार
घटस्फोटाचा अर्ज करणाऱ्या या जोडप्याचा विवाह २०१९ मध्ये पुण्यात झाला होता. दरम्यानच्या काळात गेल्या चार पाच वर्षापासून या पती-पत्नीचे मतभेद झाल्याने या दोघांचा संसार सुरळीत चालला नाही. याबाबत दोघांनाही पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केलाय. कौटुंबिक न्यायालयात या घटस्फोटाचा या अर्जादरम्यान पत्नीने पतीकडे आफ्रिकन पोपट मागितला. पत्नीच्या या मागणीमुळे या जोडप्याचं प्रकरण चर्चेत आलंय. हा पोपट परत दिला तरच मी तुला घटस्फोट देईल, असं पत्नीने न्यायालयात सांगितलंय.
पत्नीने पतीला पहिल्या भेटीवेळी भेट म्हणून आफ्रिकन पोपट दिला होता. हा पोपट दिला तरच तुला घटस्फोट देईन, असं पत्नीने सांगितलं. कौटुंबिक न्यायालयात या घटस्फोटाची सध्या वेगळी चर्चा सुरू आहे.