पुणे लोकसभा पोटनिवडणूक : पवारांनी काँग्रेसला सुनावले, म्हणाले ‘जरा तरी लाज..’

पुणे : भाजपा नेते आणि पुण्याचे खासदार गिरीष बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे तेथे लवकरच निवडणूक लागणार आहे. यांच पार्श्वभूमीवर काँग्रेस पुणे लोकसभा पोटनिवडणूक लढविणार असल्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी जाहीर केले आहे. तसेच भाजपने कधीच निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही. प्रत्येक वेळी भाजपने आपला उमेदवार दिला. म्हणून आम्ही पण पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार आहे, असे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. या वडेट्टीवारांच्या विधानावर विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय म्हणाले अजित पवार?
गिरीश बापट यांना जाऊन ३ दिवस झालेत, जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा असा टोला विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पुणे पोटनिवडणुकीबाबत वक्तव्य करणाऱ्यांना लगावला आहे.
मात्र, बापट जाऊन अजून ३ दिवस ही झाले नसताना काँग्रेस नेत्यांने केलेल्या वक्तव्यामुळे सगळीकडेच नाराजी व्यक्त केली जाते आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष ही निवडणूक एकत्रित लढणार आहोत. ज्या, ज्या निवडणुका येतील, त्या लढणार असल्याचा निर्धार वडेट्टीवारांनी व्यक्त केला. यामुळे भाजपला ही कंबरकसून मैदानात उतरावे लागणार आहे.