पंजाब : दहशतवादाचे कंबरडे मोडण्यासाठी पंजाब सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब सरकारकडून पाकिस्तान सीमेवर ९ अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात करण्यात येणार आहे. या ड्रोनद्वारे होणारी ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी पंजाब सरकार पहिल्यांदाच अँटी-ड्रोन सिस्टम तैनात करणार आहे.
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई सुरु केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता पंजाब सरकारने पाकिस्तान सीमेवर ९ अँटी-ड्रोन सिस्टीम तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. या ड्रोनद्वारे होणारी ड्रग्ज तस्करी रोखण्यासाठी पंजाब सरकार पहिल्यांदाच अँटी-ड्रोन सिस्टम तैनात करणार आहे.
आयपीएल स्थगित
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कठोर कारवाई सुरु केली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव पाहता बीसीसीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. मात्र उर्वरित सामने कधी आणि कुठे खेळवले जातील याचा निर्णय अद्याप झालेला नाही.
बीसीसीआय आता शक्य तितक्या लवकर परदेशी खेळाडूंना त्यांच्या देशात पाठवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. परदेशी खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबदेखील सध्या भारतात आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. लीग स्थगित केल्याची पुष्टी करताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “देश युद्धात असताना क्रिकेट सुरू राहिले तर ते चांगले दिसत नाही.”
१६ सामने शिल्लक
आयपीएलच्या चालू हंगामात एकूण ५७ सामने खेळले गेले आहेत. दरम्यान, ५८ वा सामना मध्यंतरी थांबवण्यात आला. हंगामात एकूण ७४ सामने खेळवले जाणार होते, जे २५ मे रोजी कोलकाता येथे संपणार होते. अशा परिस्थितीत, आता उर्वरित सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक तयार केले जाईल. २०२१ च्या सुरुवातीलाही असेच दिसून आले होते, जेव्हा लीग हंगामाच्या मध्यात स्थगित करण्यात आली होती. कोरोनामुळे आयपीएल २०२१ स्थगित करण्यात आले. त्यानंतर उर्वरित सामने यूएईमध्ये झाले होते.