बोदवड : खंडणीच्या गुन्ह्यात मदत करण्यासह चॅप्टर केस एलसीबीऐवजी स्थानिक स्तरावर करण्यासाठी 20 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 16 हजार स्वीकारणार्या पंटरासह बोदवडमधील हवालदारास जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तहसील आवारात सापळा यशस्वी
हवालदार वसंत नामदेव निकम व खाजगी पंटर एकनाथ कृष्णा बाविस्कर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शनिवारी सकाळी 11.30 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या सापल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोसि उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्यांनी हा सापळा यशस्वी केला.