---Advertisement---

लाच भोवली : आरटीओ अधिकार्‍यासह पंटर एसीबीच्या जाळ्यात

---Advertisement---

नवापूर : गुजरातमधून महाराष्ट्र हद्दीत ट्रक येवू देण्यासाठी पाचशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या पंटरासह आरटीओ अधिकार्‍याला नाशिक एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केल्याने लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. हा सापळा बुधवारी दुपारी यशस्वी करण्यात आला.
महेश हिरालाल काळे (38, रा.नाशिक) असे अटकेतील मोटार वाहन निरीक्षकाचे तर विजय मगणं माऊची (40) असे अटकेतील खाजगी पंटराचे नाव आहे.

पाचशे रुपयांची लाच भोवली
तक्रारदार हे ट्रक चालक असून त्यांना गुजरातमधून महाराष्ट्र राज्याचे हद्दीत ट्रक सह प्रवेश करण्यासाठी खाजगी इसम यांनी कागदपत्रे असतानाही बुधवारी लाच मागितली व पाचशे रुपयांची लाच स्वीकारल्याने आधी पंटर व नंतर मोटार वाहन निरीक्षकाला अटक करण्यात आली. दोघांविरोधात नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा निरीक्षक साधना इंगळे,
हवालदार प्रफुल्ल माळी, हवालदार प्रकाश डोंगरे आदींच्या पथकाने यशस्वी केला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment