---Advertisement---
जळगाव : पिरॅमिड मेडिटेशन सेंटरच्या वतीने बुधवारी (२० ऑगस्ट) एक दिवसीय मोफत पिरॅमिड मेडिटेशन शिबिर अर्थात जागृती यात्रेचे आयोजन करण्यात कारण्यात आले आहे. या शिबिरात ध्यान करण्याची सर्वात सोपी पद्धत, ध्यानाचा वैज्ञानिक दृष्टिकोन, विचार कमी करण्याची कला, तुमची ऊर्जा वाढवण्याची पद्धत आणि पिरॅमिड उर्जेचा परिचय करुन देण्यात येईल.
पिरॅमिड मेडिटेशन शिबिरात मुख्य वक्ते म्हणून पीएमसी हिंदी (दिल्ली ) वरिष्ठ पिरॅमिड मास्टर श्रीमती वसंता, व्यवस्थापकीय संचालक अलेख्य शास्त्री यांची उपस्थिती राहणार आहे. हे शिबीर दोन सत्रात न्यू नूतन वर्षा कॉलनी येथील श्री विठ्ठल रुख्मणी (मंदिर) येथे होईल. पहिले सत्र सकाळी १०:३० ते दुपारी १२:३० असणार आहे. तर दुसरे सत्र दुपारी २:३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालणार आहे.
ध्यान केल्याने तुम्ही सकारात्मक बनता. तुमची कार्यक्षमता वाढते. तुम्ही आर्थिक समृद्धी प्राप्त करता. तुमचे नाते गोड होते. तुम्ही स्वतःवर प्रेम करायला शिकता आदी फायदे होत असतात.
कार्यक्रम वेळेवर सुरू होईल. सर्व सहभागींनी कार्यक्रमाच्या १५ मिनिटे आधी येऊन आपापल्या जागा घ्याव्यात. येताना, सीट, पाण्याची बाटली आणि कॉपी-पेन सोबत आणावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी भाविका पटेल, रसिका पाटणकर, लक्ष्मी पटेल यांच्याशी संपर्क साधावा.