---Advertisement---

खुशखबर ! जळगावात गुणवत्ता निर्देशांक पातळीची ‘शुद्ध’ म्हणून नोंद

---Advertisement---

जळगाव : जळगावकरांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक आनंददायी बातमी आहे. शुक्रवारी (४ जुलै) रोजी शहरातील हवेची गुणवत्ता निर्देशांक पातळी ‘शुद्ध’ म्हणून नोंदवली गेली आहे. गुणवत्ता निर्देशांक सध्या ४५ वर असल्याने सध्याची ‘हवा’ जळगावकरांच्या आरोग्यासाठी पोषक ठरणारी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

शहरातील प्रदूषणाचा स्तर एमआयडीसी, बीजे मार्केट व गिरणा टाकी परिसरात प्रदूषण नियंत्रण विभागाकडून नोंदविला जातो. प्रदूषणाचा स्तर अभ्यासण्यासाठी सल्फरडाय ऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड या वायूंचे प्रमाण अभ्यासले जाते. सल्फरडाय ऑक्साइडचा सरासरी स्तर एरव्ही १६ ते १९ च्या दरम्यान असतो. सध्या तो ६ ते ७ एवढा नोंदविला गेला आहे; तर नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण एरव्ही सरासरी ४०-४५ च्या दरम्यान असते. मात्र ते सध्या १५ च्या घरात आहे.

दरम्यान, सध्या शहरातील हवेच्या प्रदूषणात घट झाल्याची दिलासादायी नोंद झाली आहे. यंदा १५ मेपर्यंत शहराचे हवाप्रदूषण धोक्याच्या पातळीवर असताना मान्सूनपूर्व पावसाने ही पातळी धुऊन काढली. पावसामुळे हवेतील धुलिकणांचे प्रमाण ७० टक्क्यांनी घटले आहे.

एप्रिल व जूनमधील प्रदूषणाचा स्तर (सरासरी)

घटक एप्रिल जून

सल्फरडाय ऑक्साइड । १६ ते २० । ६ ते ७

नायट्रोजन ऑक्साइड । ४० ते ४५ । १५ ते २०

धुलिकण । ८० ते ९० । ३५ ते ४०

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---