गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरलेली गोकुळ दूध महासंघाची सभा आता राजकीय शक्तीप्रदर्शनाचा आखाडा बनतेय की काय? असं चित्र निर्माण झालं आहे. सर्वसाधारण सभेआधीच महासंघातील सत्ताधारी सतेज पाटील गट व विरोधक शौमिका महाडिक गटामध्ये आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं होतं.
आता पुन्हा एकदा त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. गोकुळ शिरगावमधील पंचतारांकित वसाहतीमधल्या मैदानात महासंघाची ६१ वी सभा होत असून तिथे गोंधळ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
गोकूळ दूध संघाच्या सभेसाठी शौमिका महाडिक दाखल झाल्या. सभास्थळाबाहेर सभासदांची मोठी गर्दी झालीय. शाहूवाडी, भूदरगड तालुक्यातून आलेले सभासद ताटकळत उन्हात थांबले आहेत. सभेमधील अर्धे सभासद बोगस आहेत. आतमध्ये पोहोचलेल्या सभासदांना झेरॉक्स कॉपी देण्यात आल्या. खरे सभासद नको म्हणून बॅरिकेट्स लावले, असा आरोप शौमिका महाडिक यांनी केला.