राहुल द्रविडबाबत मोठी बातमी समोर येत आहे. टीम इंडियासोबतचा कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड आता केकेआरमध्ये सामील होऊ शकतो, असेही सांगण्यात आले. पण, ताज्या अहवालानंतर त्या सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे. आता अशी बातमी आहे की, राहुल द्रविड आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचा मुख्य प्रशिक्षक बनू शकतो.
भारतीय संघासह राहुल द्रविडचा कार्यकाळ २०२४ च्या T20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकून संपला. आता तो राजस्थान रॉयल्समध्ये सामील झाल्याची बातमी आहे. रिपोर्टनुसार, द्रविड आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचा नवा मुख्य प्रशिक्षक असेल. याबाबतची अधिकृत घोषणाही लवकरच होऊ शकते. वृत्तानुसार’ राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात चर्चा सुरू आहे आणि आता यासंदर्भात अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.
राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी त्याने या संघाचे नेतृत्वही केले होते. राहुल द्रविड राजस्थान संघाचा दुसरा कर्णधार ठरला आहे. 39 वर्षीय द्रविडला 2012 मध्ये राजस्थान रॉयल्सने कर्णधार बनवले होते. त्याने 40 सामन्यांमध्ये या संघाची कमान सांभाळली असून त्यापैकी 23 सामन्यांत त्याने विजय मिळवला आहे. कर्णधारपद सोडल्यानंतर द्रविड 2014 आणि 2015 च्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शकही बनला होता. यानंतर द्रविड भारताच्या अंडर-19 आणि अ संघाचा प्रशिक्षक झाला.
प्रशिक्षक म्हणून द्रविडचे यश
द्रविडच्या प्रशिक्षणाखाली भारताचा अंडर-19 संघ 2018 मध्ये वर्ल्ड चॅम्पियन बनला. यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमी, बेंगळुरू येथे क्रिकेट ऑपरेशन्सचा प्रमुख बनला. त्यानंतर 2021 मध्ये ते टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनले, जिथे त्यांनी रवी शास्त्रीची जागा घेतली. टी-20 विश्वचषक जिंकून टीम इंडियासोबतची त्याची कोचिंग कारकीर्द संपली. आता या करारानंतर राजस्थान रॉयल्सलाही त्यांच्याकडून अशाच अपेक्षा असतील, जे 2008 पासून त्यांच्या दुसऱ्या आयपीएल विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहेत.