Rahul Dravid Celebration : द्रविडला उचलण्याचा कोहली-रोहितने केला गुपचूप प्लॅन, मग… पहा व्हिडिओ

Rahul Dravid Celebration : टी२० वर्ल्ड कप २०२४ स्पर्धेचा अंतिम सामना शनिवारी (२९ जून) बार्बाडोसला भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. या सामन्यात भारतीय संघाने ७ धावांनी विजय मिळवला आणि दुसऱ्यांदा टी२० वर्ल्ड कपचे विजेतेपद जिंकले.

हा सामना भारताचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडसाठीही अखेरचा सामना ठरला. या सामन्यासह त्याचा भारतीय संघाबरोबरचा मुख्य प्रशिक्षक म्हणून अखेरचा सामना ठरला.

विशेष म्हणजे अखेरच्या सामन्यात त्याला भारतीय संघाने टी२० वर्ल्ड कप विजयाची अनमोल भेटही दिली. त्यामुळे आता द्रविडने प्रशिक्षक म्हणून दोन वर्ल्ड कप जिंकले. यापूर्वी तो प्रशिक्षक असताना १९ वर्षांखालील वर्ल्ड कप २०१८ साली भारतीय संघाने जिंकला होता. दरम्यान, शनिवारी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडे टी२० वर्ल्ड कप विजयाची ट्रॉफी सोपवल्यानंतर भारतीय संघाने जोरदार सेलीब्रेशन केले. इतकेच नाही, तर रोहित आणि विराटने ज्युनियर खेळाडूंसोबत द्रविडला उचलत वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं.

राहुल द्रविड तीन वर्षे भारतीय संघाशी संबंधित होता. या काळात त्याने कर्णधार रोहित शर्मासह टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्यासाठी खूप मेहनत घेतली. 2023 च्या विश्वचषकातील पराभवाने द्रविडचा कार्यकाळ संपला आणि त्याने अलविदा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नंतर भारतीय कर्णधार आणि बीसीसीआयच्या विनंतीवरून त्याने टी-२० विश्वचषकापर्यंत मुख्य प्रशिक्षकपदी राहण्याचे मान्य केले. विश्वविजेता बनवण्यात त्याचे योगदान संपूर्ण संघाला चांगलेच ठाऊक होते. त्यामुळे रोहित आणि विराटने ज्युनियर खेळाडूंसोबत मिळून द्रविडला उचलण्याचा खास प्लॅन बनवला आणि वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन केलं.

द्रविडला खास निरोप
राहुल द्रविडने एक खेळाडू म्हणून भारतीय संघात मोठे योगदान दिले होते. यानंतर जेव्हा ते प्रशिक्षक झाले तेव्हा त्यांनी टीम इंडियाला नव्या उंचीवर नेले. त्यामुळे खेळाडूंसोबतच तोही विश्वचषकाच्या ट्रॉफीचा हक्कदार ठरला. बार्बाडोसमध्ये ही ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित आणि विराटसह संघातील उर्वरित खेळाडूंनी द्रविडला हवेत उडवले. त्याने भारतीय प्रशिक्षकाला हवेत फेकून जल्लोष केला. यादरम्यान राहुल द्रविड खूप आनंदी दिसत होता, पण या सेलिब्रेशनने तोही थक्क झाला आणि त्याचे तोंड उघडेच राहिले.