नवी दिल्ली : मोदी या आडनावाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरल्यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना दोषी ठरवण्यात आले होते. सुरत सत्र न्यायालयाने याप्रकरणात राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर आता राहुल गांधी यांना सर्वात मोठा झटका बसला आहे.
लोकसभा अध्यक्षांकडून राहुल गांधी यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. हा काँग्रेस पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे. कोर्टाचा निर्णय आल्यानंतर कालपासून काँग्रेस भाजपविरोधात आक्रमक झाली होती. मात्र, संसदेत अदानी प्रकरणावरुन आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप अत्यंत आक्रमक असल्याचे दिसत आहे.