तरुण भारत लाईव्ह । मुंबई : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी वारंवार केलेल्या विधानामुळे राजकीय वातावरण तापलेले होते. मात्र आता शरद पवारांच्या मध्यस्थीमुळे राहुल गांधी यापुढे सावरकरांवर बोलणार नाहीत. अशी भुमिका स्पष्ट केल्याचे समजते आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या विधानामुळे महाविकास आघाडीत असलेल्या उद्धव ठाकरे यांची कोंडी झाल्याची स्थिती आहे. काल संध्याकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी विरोधी नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राहुल गांधी आणि् शरद पवार दोन्ही नेते उपस्थित होते.
सावरकरांना माफिवीर म्हणणे योग्य नाही. सावरकर आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यामध्ये काही संबंध नाही, अशी भूमिका पवारांनी बैठकीत मांडली आणि यावर खरगे यांनी सहमती दर्शवली, असे बोलले जात आहे. राहुल गांधींनी सुद्धा आपण पवारांच्या मताचा आदर करतो, असं म्हंटलंय, अशी माहिती मिळत आहे. आपल्याला भाजपचा सामना करायचा असेल तर, आपसात मतभेद असून चालणार नाही, असेही राहुल गांधी म्हंटल्याचे बोलले जात आहे.