Politics : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच राहुल गांधी हे पंतप्रधानांवर बिनबुडाचे आरोप करत असल्याचेही सांगितले.
काय म्हणाल्या निर्मला सीतारमण?
निर्मला सीतारामन म्हणाल्या की जर राहुल गांधींना वाटत असेल की अदानींना “सर्व गोष्टी” दिल्या आहेत, तर ते खरे नाही. “केरळमध्ये काँग्रेसचे सरकार होते, त्या सरकारने विझिंजम पोर्ट अदानी समूहाला दिले. ते कोणत्याही निविदाच्या आधारे दिले गेले नाही.” राहुल गांधी वारंवार पंतप्रधानांवर निराधार आरोप करत आहेत. काँग्रेस आणि राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांचा उद्देश वाढत्या भारतीय अर्थव्यवस्थेकडचे लक्ष हटवण्यासाठी आहे.
जागतिक आर्थिक मंदीच्या काळात भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असताना असे आरोप केले जात आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गदारोळात अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर करावा लागल्याचे दुःख व्यक्त केले आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, चार महिन्यांपूर्वी अर्थसंकल्प तयार करण्याच्या सुरुवातीपासून त्यांनी अर्थसंकल्पात समाविष्ट असलेल्या प्रत्येक गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला जेणेकरून त्यांना संसदेत खासदारांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यात अडचण येऊ नये. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बेंगळुरू येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या.