MSP बद्दल, राहुल गांधींची मोठी घोषणा; वाचा सविस्तर

नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी लाठी आणि अश्रूधुराच्या नळकांड्यासह जवानांची मोठी फौज तैनात करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सरकारकडून काळजी घेतली जात आहे. पण, गोळ्या झाडा किंवा लाठीचार्ज करा, आमचे शांततेत आंदोलन सुरूच राहील, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. दरम्यान, आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट करुन मोठी घोषणा केली आहे.

राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटले की, “शेतकरी बांधवांनो, आजचा दिवस ऐतिहासिक! स्वामिनाथन आयोगानुसार प्रत्येक शेतकऱ्याच्या पिकांवर किमान MSP कायदेशीर हमी देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. हे पाऊल १५ कोटी शेतकरी कुटुंबांची समृद्धी सुनिश्चित करून त्यांचे जीवन बदलेल. न्यायाच्या मार्गावर काँग्रेसची ही पहिली हमी आहे’, असं या पोस्टमध्ये राहुल गांधींनी म्हटले आहे.

आज काँग्रेसची न्याययात्रा अंबिकापूर येथे आहे, यावेळी संबोधित करताना गांधी म्हणाले, ‘मणिपूर भाजपने जाळले. आम्ही आदिवासी भागात जाऊन त्यांच्याशी बोलत आहोत. चिनी उत्पादने भारतात विकली जात आहेत. देशात महागाई वाढत आहे. भारत जोडो यात्रेसाठी प्रत्येक राज्यातून लाखो लोक आले आहेत. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडावे लागेल. हिंसाचार न पसरवण्याचा आमचा प्रयत्न आहे. भाजपचे कार्यकर्ते द्वेष पसरवत आहेत, असा आरोपही गांधी यांनी केला.