काश्मीरमध्ये राहुल गांधींच्या सुरक्षेबाबत केंद्राचं मोठं पाऊल

श्रीनगर : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरु आहे. या यात्रेदरम्यान केंद्रानं पुरेशी सुरक्षा व्यवस्था पुरवलेली नाही, असा आरोप करत राहुल गांधींनी ही यात्रा स्थगित केली होती. त्यांच्या या गंभीर आरोपानंतर आता यात्रेला मोठं सुरक्षा कवच प्रदान करण्यात आलं आहे, याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत मोठ्या प्रमाणावर जवान सुरक्षेसाठी दिसून येत आहेत.

जम्मू आणि काश्मीरच्या अवंतीपोरा इथं सध्या भारत जोडो यात्रा सुरु आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्या बहिण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी देखील सहभागी झाल्या आहेत. तसेच पीडीपीच्या प्रमुख महबुबा मुफ्ती देखील या यात्रेत सहभागी झाल्या. दरम्यान, अवंतीपोरा इथं भारत जोडो यात्रेला केंद्रानं जवानांची मोठी सुरक्षा पुरवली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे.