Raigad : तुतारी चिन्हाचं रायगडावर अनावरण

Raigad :    केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह दिले आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन भूमित जाऊन शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचं अनावरण रायगडावर  करण्यात आले.  यानंतर शरद पवारांनी जनतेशी संवाद साधताना तुतारी जनतेला प्रेरणा देईल, असा विश्वास निर्माण केला.

 

शरदचंद्र पवार गटाला आगामी लोकसभा निवडणुकीसाठी हे चिन्ह वापरता येणार आहे.   यावेळी शरद पवार म्हणाले कि , “सध्याचा संघर्ष हा वैचारिक आहे. या देशात अनेक राजे  झाले, संस्थानिक झाले परंतु रयतेचा राजा एकच झाला. सध्या राज्यात अडचणी वाढतील अशी स्थिती आहे. शिवछत्रपतींचे राज्य सामान्यांची सेवा करणारे राज्य होते. आज महाराष्ट्राची स्थिती बदलायची असेल तर पुन्हा एकदा याठिकाणी जनतेचे राज्य येईल यासाठी प्रयत्न करावे लागतील”.

 

“निवडणूक आयोगाने रणशिंग फुंकायला तुतारी दिली आहे. संघर्षातून प्रेरणा देणारी ही तुतारी आहे. तुमच्या संघर्षातून, त्यागातून यश मिळणार याची खात्री आहे. या ऐतिसाहिक भूमीत आपण आलोय. या ठिकाणाहून प्रेरणा घेऊन जनतेची सेवा करुया”, असंही आवाहन शरद पवारांनी केलं.

 

 पालखीतून गडावर दाखल

तुतारी हे राज्याचे ऐतिहासिक वाद्य आहे.  यानिमित्ताने या पक्षाच्या चिन्हाचे अनावरण आज रायगड किल्ल्यावर करण्यात आले. शरद पवार रोप वेने रायगडावर पोहोचले. तर नंतर त्यांनी पालखीचा आधार घेतला.  ४० वर्षांनंतर ते किल्ले रायगडावर  आलेत.