भुसावळ : उत्तर रेल्वेच्या लखनौ मंडळात कानपूर ते ऐशबाग दरम्यान ब्रीज क्रमांक ११० चे काम सुरू असल्याने ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे. या कारणास्तव भुसावळ विभागातून जाणाऱ्या दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून चार गाड्या शॉर्ट टर्मिनेट करण्यात आल्या आहेत.
लखनौ मंडळाच्या या कामामुळे गोरखपूर-पनवेल एक्सप्रेस (गाडी क्रमांक १५०६५) ही गाडी २० मार्च २०२५ पासून २९ एप्रिल २०२५ पर्यंत आपल्या निर्धारित मागएिवजी गोरखपूर, अयोध्या धाम, माँ बेल्हा देवी धाम, प्रतापगढ़, प्रयागराज आणि कानपूर सेंट्रल मार्गे पनवेलकडे धावेल तसेच गोरखपूर लोकमान्य तिलक टर्मिनस एक्सप्रेस (गाडी क्रमांक २०१०४) ही गाडी १९ मार्च २०२५ पासून २९ एप्रिल २०२५ पर्यंत गोरखपूर, अयोध्या धाम, माँ बेल्हा देवी धाम, प्रतापगढ़, प्रयागराज आणि कानपूर सेंट्रलमार्गे लोकमान्य तिलक टर्मिनसकडे धावेल.
दरम्यान, पुणे-लखनौ एक्सप्रेस (गाडी क्रमांक ११४०७) ही गाडी १८ मार्च २०२५ पासून २२ एप्रिल २०२५ पर्यंत केवळ कानपूर सेंट्रलपर्यंत धावेल. तसेच, लखनौ-पुणे एक्सप्रेस (गाडी क्रमांक ११४०८) ही गाडी २० मार्च २०२५ पासून २४ एप्रिल २०२५ पर्यंत कानपूर सेंट्रल येथून निर्धारित वेळेनुसार प्रवास सुरू करेल. याशिवाय, लोकमान्य तिलक टर्मिनस-लखनौ एसी सुपरफास्ट (गाडी क्रमांक २२१२१) ही गाडी २२ मार्च २०२५ पासून २६ एप्रिल २०२५ पर्यंत केवळ कानपूर सेंट्रलपर्यंतच धावेल.
लखनौ-लोकमान्य तिलक टर्मिनस एसी सुपरफास्ट (गाडी क्रमांक २२१२२) ही गाडी २३ मार्च २०२५ पासून २७एप्रिल २०२५ पर्यंत कानपूर सेंट्रल येथून निर्धारित वेळेनुसार प्रवास सुरू करेल. प्रवाशांनी आपल्या प्रवासाची योजना आखताना या बदलांची नोंद घ्यावी तसेच अधिक माहितीसाठी रेल्वेची अधिकृत वेबसाईट किंवा संबंधित हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.