Railway Cancelled : रेल्वेच्या प्रवाशांनो, रेल्वेने प्रवास करण्यापूर्वी ही बातमी वाचा, अनेक गाड्या झाल्या आहेत रद्द…

Railway Cancelled भुसावळ: आग्रा विभागामधील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमॉडलिंगचे काम पलवल – मथुरा दरम्यान नॉन इंटरलॉकिंगचे काम केले जात असल्याने, रेल्वे प्रशासनाकडून यासाठी ब्लाॅक घेतला आहे. यामुळे विविध दिवशी तब्बल २४ रेल्वे गाह्या अप-डाऊन मार्गावरील रद्द केल्या आहे.

यात भुसावळ विभागातून जाणाऱ्या-येणाऱ्या मेल, एक्सप्रेस गाडया रद्द केल्या आहे.

आग्रा विभागातील मथुरा स्टेशन येथे यार्ड रिमाॅडलिंगचे काम केले जात असून पलवल – मथुरा दरम्यान नाॅन इंटरलाॅकिंगचे काम केले जाणार आहे. यामुळे भुसावळ विभागातून धावणाऱ्या २४ रेल्वे गाड्या रद्द केल्या आहैे.

या रद्द झालेल्या गाड्यामध्ये ११०५७ दादर-अमृतसर एक्सप्रेस ही गाडी दि. २० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत रद्द,

११०५८ अमृतसर-दादर एक्सप्रेस ही गाडी दि. २३ जानेवारी ते दि. ६ फेब्रुवारीपर्यंत रद्द,

१२१४७ कोल्हापूर -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी दि. ३० जानेवारीला रद्द,

१२१४८ हजरत निजामुद्दीन – कोल्हापूर एक्सप्रेस ही गाडी दि. १ फेब्रुवारीला रद्द,

१२१७१ लोकमान्य टिळक टर्मिनस -हरिद्वार सुपर एक्सप्रेस ही गाडी दि. २२ जानेवारी ते १ फेब्रुवारी पर्यंत रद्द केली आहे.

१२१७२ हरिद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्सप्रेस ही गाडी दि. २३ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यत रद्द,

१२६२९ यशवंतपूर -हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी दि. २३ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यत रद्द,

१२६३० हजरत निजामुद्दीन – यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी दि. २६ जानेवारी ते ७ फेब्रुवारीपर्यत रद्द,

१२७१५ नांदेड -अमृतसर सचखंड एक्सप्रेस ही गाडी दि. २१ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यत रद्द,

१२७१६ अमृतसर- नांदेड सचखंड एक्सप्रेस ही गाडी दि. २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यत रद्द,

१२७५१ नांदेड – जम्मूतवी हमसफर एक्सप्रेस ही गाडी दि.२६ जानेवारी आणि दि. २ फेब्रुवारीपर्यत रद्द,

१२७५२ जम्मूतवी-नांदेड हमसफर एक्सप्रेस ही गाडी दि. २६ जानेवारी आणि ४ फेब्रुवारीपर्यत रद्द,

१२७५३ नांदेड – हजरत निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्सप्रेस ही गाडी दि. २३ आणि ३० जानेवारीपर्यत रद्द केली आहे.

१२७५४ हजरत निजामुद्दीन – नांदेड संपर्कक्रांती एक्सप्रेस ही गाडी दि. २४ आणि ३१ जानेवारीला रद्द केली आहे.

१२७८१ म्हेसुर – हजरत निजामुद्दीन स्वर्ण जयंती एक्सप्रेस ही गाडी दि.१२, १९ जानेवारी आणि २ फेब्रुवारीला रद्द असेल.

१२७८२ हजरत निजामुद्दीन- म्हेसुर स्वर्ण जयंती एक्सप्रेस ही गाडी दि. १५, २२ जानेवारी आणि ५ फेब्रुवारीला रद्द,

२०६५७ हुबळी – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ही गाडी दि. १२ जानेवारी ते २ फेब्रुवारीपर्यंत रद्द,

२०६५८ हजरत निजामुद्दीन- हुबळी एक्सप्रेस ही गाही दि. १४ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यत रद्द राहील.

२२४५५ साईनगर शिर्डी -कालका एक्सप्रेस ही गाडी दि. २७ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यत रद्द राहील.

२२४५६ कालका- साईनगर शिर्डी एक्सप्रेस ही गाडी दि. २५ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यत रद्द,

२२६८५ यशवंतपूर-चंदिगढ एक्सप्रेस ही गाडी दि. २० जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यत रद्द,

२२६८६ चंदिगढ-यशवंतपूर एक्सप्रेस ही गाडी दि. २३ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत रद्द,

१२४०५ भुसावळ-हजरत निजामुद्दीन गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी २८ जानेवारी ते ६ फेब्रुवारीपर्यंत रद्द

१२४०६ हजरत निजामुद्दीन-भुसावळ गोंडवाना एक्सप्रेस ही गाडी दि. २६ जानेवारी ते ४ फेब्रुवारीपर्यतरद्द केली आहे.

प्रवाशांनी या रद्द गाड्यांची नाेंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.