मुंबई : भारतीय रेल्वेअंतर्गत पूर्व रेल्वे विभागात शिकाऊ (Apprenticeship) शोधत असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. पूर्व रेल्वेने ३११५ जागांवर शिकाऊ पदांसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली आहे. प्रसिध्द झालेल्या जाहीरातीनुसार, इच्छुक आणि पात्र उमेदवार २७ सप्टेंबर २०२३ पासून पूर्व रेल्वे विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. Eastern Railway Apprentice Recruitment 2023 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ ऑक्टोबर २०२३ पर्यंत ठेवण्यात आली आहे.
एकूण रिक्त जागा : ३ हजार ११५
भरली जाणारी पदे फिटर, वेल्डर, मेकॅनिकल, मशिनिस्ट, सुतार, पेंटर, लाईनमन, वायरमन, इलेक्ट्रिशियन इत्यादी
अर्ज शुल्क :
सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी अर्ज शुल्क १०० रुपये ठेवण्यात आले आहे. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, PWD, महिला यांच्याकडून अर्जासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
वयोमर्यादा :
पूर्व रेल्वे प्रशिक्षणार्थी भरती २०२३ (Eastern Railway Apprentice Recruitment 2023) साठी अर्ज करणार्या उमेदवारचे किमान वय १५ वर्षे आणि कमाल वय २४ वर्षे ठेवण्यात आले आहे. (२६ ऑक्टोबर २०२३ नुसार वयाची गणना केली जाईल.) शिवाय, सरकारी नियमांनुसार OBC, EWS, SC, ST आणि राखीव प्रवर्गासाठीही वयात सवलत जाहीर करण्यात आली आहे.
शैक्षणिक पात्रता:
Eastern Railway Apprentice Recruitment 2023 मधील जगांस्तही अर्ज करणारा उमेदवार १० वी उत्तीर्ण असावा.
तसेच, संबंधित विषयात आयटीआय असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया :
मेरिट लिस्ट, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.
पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्ज कसा करावा :
– सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
– यानंतर रिक्रूटमेंट लिंकवर क्लिक करा.
– वैयक्तिक तपशील प्रविष्ट करून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड तयार करा.
– यानंतर फॉर्म भरा आणि सबमिट करा.
– संबंधित कागदपत्रे अपलोड करा आणि फी भरा.
– फॉर्मची एक प्रत डाउनलोड करा आणि ती तुमच्याकडे ठेवा.
(अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या अधिसूचनेत उमेदवार अधिक माहिती तपासू शकतात.)