---Advertisement---
भुसावळ : रेल्वे प्रवाशांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. अर्थात रेल्वे प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन भुसावळ ते दादर यादरम्यान धावणाऱ्या विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या गाड्या आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत धावणार आहेत.
क्र. ०९०४९ दादर ते भुसावळ ही त्रिसाप्ताहिक विशेष गाडी तसेच क्र. ०९०५० भुसावळ ते दादर त्रिसाप्ताहिक गाडी यापूर्वी २६ सप्टेंबरपर्यंत होत्या. त्या आता ३१ डिसेंबरपर्यंत धावतील.
क्र. ०९०५१ दादर ते भुसावळ त्रिसाप्ताहिक विशेष गाडी तसेच क्र. ०९०५२ भुसावळ ते दादर त्रिसाप्ताहिक विशेष गाडी २९ डिसेंबरपर्यंत चालविण्यात येणार होत्या. या दोन्ही गाड्यांची मुदतही ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
गोमतीनगरसाठीही विशेष रेल्वे
दिवाळी व छठपूजा सणाच्या कालावधीत होणारी प्रवासी गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस-गोमतीनगरदरम्यान विशेष साप्ताहिक उत्सव गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
क्र. ०५३२६ ही विशेष गाडी २८ सप्टेंबर ते २२ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ७:५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १०.४५ वाजता गोमतीनगर पोहोचेल. तर क्र. ०५३२५ ही विशेष गाडी २७सप्टेंबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत प्रत्येक शनिवारी गोमतीनगर येथून ००:१५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ५:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.
या गाडीला कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, राणी कमलापती, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी जंक्शन, ओरई, कानपूर, ऐशबाग, लखनऊ सिटी आणि बादशाहनगर असे थांबे असतील.