---Advertisement---

PAK vs BAN : पावसाचा व्यत्यय, टॉसला विलंब, सामना रद्द होणार का?

---Advertisement---

Champions Trophy 2025 : पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ अत्यंत निराशाजनक ठरली आहे. यजमान असूनही त्यांचा प्रवास पहिल्याच फेरीत संपुष्टात आला आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर, भारताविरुद्धही त्यांना लज्जास्पद पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे गतविजेत्या पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहोचण्याआधीच गाशा गुंडाळावा लागला. दरम्यान, आज रावळपिंडीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात अखेरचा साखळी सामना होत आहे. मात्र, हा सामना केवळ औपचारिक ठरणार आहे. त्यातच हवामानाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे सामना वेळेत सुरू होऊ शकलेला नाही आणि जर सामना पूर्णपणे रद्द झाला, तर पाकिस्तानला अवघ्या एका गुणावर समाधान मानावे लागणार आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी तब्बल १८० कोटी रुपये खर्च करून स्टेडियमचे नुतनीकरण केले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांना संघाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. २०१७ च्या विजेत्या पाकिस्तान संघाला पुन्हा एकदा जेतेपद जिंकण्याची खात्री वाटत होती, मात्र पहिल्या फेरीतच स्पर्धेबाहेर फेकले जाणे त्यांच्यासाठी मोठा धक्का ठरला.

बांगलादेशविरुद्ध सामना केवळ औपचारिकता
आज रावळपिंडीत पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात अखेरचा साखळी सामना होत आहे. मात्र, हा सामना केवळ औपचारिक ठरणार आहे. बांगलादेशलाही दोन पराभवांमुळे स्पर्धेबाहेर जावे लागले आहे. त्यातच हवामानाचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे सामना वेळेत सुरू होऊ शकलेला नाही आणि जर सामना पूर्णपणे रद्द झाला, तर पाकिस्तानला अवघ्या एका गुणावर समाधान मानावे लागणार आहे.

यजमान असूनही दुबईत खेळावे लागलेला पहिला संघ
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात यजमान असूनही साखळी सामना खेळण्यासाठी दुसऱ्या देशात जाण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली. भारताने पाकिस्तानात खेळण्यास नकार दिल्याने हा सामना दुबईत खेळवण्यात आला. त्या सामन्यात भारताने विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आणि त्यांना स्पर्धेबाहेर फेकले.

पाकिस्तान संघाचा सहाय्यक प्रशिक्षक अझहर महमूद यांनी संघाच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारली आहे. ते म्हणाले, “आम्ही या स्पर्धेत चांगले खेळलो नाही. दुखापतींमुळे आमच्या संघाला मोठा फटका बसला. भारताविरुद्ध आम्ही स्वतःवर खूप दबाव आणला. मात्र, आम्हाला कुठे सुधारणा करायची आहे, हे आम्हाला माहिती आहे.”

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी एकूण बक्षीस रकमेतील ५३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. विजेत्या संघाला १९.४६ कोटी, उपविजेत्याला ९.७२ कोटी, तर उपांत्य फेरीतील पराभूत संघांना प्रत्येकी ४.८६ कोटी मिळणार आहेत. गट फेरीतील प्रत्येक विजयासाठी ३० लाखांहून अधिक बक्षीस आहे. मात्र, पाकिस्तानला यंदाच्या स्पर्धेत कोणतेही बक्षीस मिळण्याची शक्यता नाही.

निराशाजनक कामगिरीमुळे चाहत्यांचा संताप
पाकिस्तान क्रिकेट संघाच्या खराब खेळावर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यजमान असूनही पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आता पाकिस्तान संघाला आगामी स्पर्धांसाठी नव्याने तयारी करावी लागणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment