राज्याच्या काही भागात पावसाने मुसळधार हजेरी लावली. तर काही भागात अद्याप पावसाची प्रतीक्षा सुरू आहे. अशातच हवामान विभागाने दिलासा देणारा अंदाज वर्तवला आहे.
मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर हळूहळू वाढणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये आगामी 4 ते 5 दिवसांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळेल, असाही अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
उद्या (16 सप्टेंबरला) पालघर, मुंबई आणि ठाणे वगळता संपूर्ण राज्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात यलो अलर्ट देण्यात आला आहे.
हवामान विभागाने महाराष्ट्रातील परभणी, जालना, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, नांदेड, यवतमाळ, अमरावती, वर्धा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडाऱ्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, लातूर, नांदेडला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, पालघर, ठाणे आणि रायगड विभागालाही यलो अलर्ट दिला आहे. त्याचबरोबर सतर्कतेचे आवाहनही केले आहे.