मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत. राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पोहोचले असून त्यांच्यात विविध मुद्यांवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चर्चेत टोलनाका हा महत्त्वाचा मुद्दा असण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या टोल आणि मराठी पाट्यांचा मुद्दा चर्चेत आहे. याच पार्श्वभुमीवर राज ठाकरेंनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. याशिवाय मुंबईतील विविध विकासकामांच्या संदर्भातही राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेच्या शासकीय निवासस्थानी पोहोचले आहेत. दरम्यान, त्यांच्यात काय चर्चा होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.