तरुण भारत लाईव्ह । उमेश उपाध्याय । Kartavya Path ‘राज’ हा शब्द उच्चारताच केवळ राज्यकारभार, प्रशासन या गोष्टी डोळ्यापुढे येतात. राजकाज म्हणजे राजा, दंड (शिक्षा), नियम, कायदे आणि राज्यकर्त्यांचे अधिकार. भारताच्या लोकशाही व्यवस्थेला जेव्हा ‘राजकाज’ची ही भावना लागू केली जाते तेव्हा ती अगदी एकतर्फी दिसते. Kartavya Path लोकांनी, लोकांसाठी लोकांकरवी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही. ‘राज’ या शब्दामध्ये केवळ राज्यकारभाराचाच बोध होतो. उलट ‘कर्तव्य’ या शब्दात राजा आणि प्रजा या दोघांच्याही एकूण कार्यपद्धतीचे प्रतिध्वनी उमटतात. Kartavya Path कोणत्याही राष्ट्राची लोकशाही व्यवस्था तिथे राहणा-या लोकांच्या आकांक्षा, त्यांचा वारसा, त्यांचा इतिहास, त्यांची संस्कृती आणि परंपरा याशिवाय अपूर्णच असते. Kartavya Path ती फक्त ‘राज’पुरतीच मर्यादित कशी काय राहणार?
Kartavya Path १९५० पासूनच दिल्लीत २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाची परेड आयोजित केली जात आहे. १९५० ते १९५४ पर्यंत ही परेड वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. पण १९५५ पासून ही परेड रायसीना हिलवर स्थित, राष्ट्रपती भवनपासून (जे आधी व्हॉईसरॉयचे निवासस्थान होते) सुरू होऊन लाल किल्ल्यावर समाप्त होत असते. Kartavya Path इंग्रजांनी भारताच्या व्हॉईसरॉयसाठी म्हणजेच लाटसाहेबांसाठी बांधलेल्या भवनापासून मुघलांच्या किल्ल्यापर्यंत होणारी ही परेड एकप्रकारे आमच्या गुलामीच्या इतिहासाचीच आठवण करून देते. आपला देश परकीयांचा कसा गुलाम होता हेच जणू या मार्गामुळे सूचित होत होते. कोणतेही राष्ट्र केवळ लष्कर, राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्थेवर आधारित नसते. Kartavya Path तर त्यात विचार, संस्कृती, श्रद्धा, परंपरा यांच्याशी संबंधित भावनांचे अनेक पदर आहेत.
भारतासारख्या प्राचीन देशात, समाजाला गेली अनेक वर्षे विदेशी आक्रमकांचे अत्याचार सहन करावे लागले, तेव्हा ही राष्ट्रविषयक भावना अधिक महत्त्वाची ठरते. Kartavya Path गुलामगिरीची ही भावना आमच्या सामाजिक जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये जसे शिक्षण, भाषा, प्रशासकीय व्यवस्था, न्यायव्यवस्था, कला, संस्कृती इत्यादींमध्ये खोलवर शिरली आहे. एकप्रकारे या भावनेने हताशा, निराशा, आत्मदैन्य आणि न्यूनगंड यांना जन्म दिला. Kartavya Path मानसिक गुलामीची ही वेदना, हा सल बोचत असताना त्यातून बाहेर पडण्याची तळमळ आणि अस्वस्थता समाजाच्या खालच्या स्तरातही कायम होती हेही निर्विवाद आहे. Kartavya Path त्यासाठी साहित्यिक, सामाजिक, वैचारिक, लष्करी, राजकीय अशा प्रत्येक स्तरावर चळवळी आणि संघर्षांची ही अखंड आणि अनंत ज्योत समाजाच्या हृदयात सदैव तेवत राहिली. Kartavya Path कुठल्याही राष्ट्रासाठी राजकीय स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाचे असते. परंतु ते कोणत्याही राष्ट्राचे एकमेव आणि अंतिम ध्येय असू शकत नाही.
Kartavya Path पायात पडलेल्या राजकीय गुलामगिरीच्या बेड्या तोडल्यानंतरच संपूर्ण स्वातंत्र्याचा संघर्ष सुरू होतो. प्रदीर्घ गुलामगिरीमुळे समाजाच्या भावविश्वात घर करून बसलेल्या गौणत्वाच्या, न्यूनगंडाच्या या बेड्या तोडून टाकण्याचा हा संघर्ष आहे. या अर्थाने राजकीय आणि प्रशासकीय स्वातंत्र्य हा पुढच्या दीर्घ प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पाच म्हणता येईल. भारताचा हा प्रवास १९४७ मध्ये सुरू झाला. Kartavya Path स्वातंत्र्याच्या अमृतकाळात आता त्याच्या अमृताच्या थेंबाचा प्रभाव राष्ट्रजीवनाच्या प्रत्येक अंगावर दिसून येत आहे. २०१४ पासून याने नवी झेप घेतली आहे यात शंकाच नाही. ‘राजपथ ते कर्तव्यपथा’पर्यंतच्या या अनोख्या लोकशाही प्रवासाला देशाला ७५ वर्षे झाली आहेत. Kartavya Path यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये विविध राज्यांतून आलेल्या चित्ररथांतून या प्रवासाचे संपूर्ण चित्र समोर आले.
या परेडमधून आत्मनिर्भरतेच्या दिशेने वेगाने पावले टाकत आपल्या सशस्त्र दलांच्या आत्मविश्वासाचे आणि धैर्याचे प्रदर्शन होते. मंदिरे, नृत्यपरंपरा, उपासनापद्धती, श्रद्धा, आत्मविश्वास, महिला सक्षमीकरणाचे प्रयत्न या सर्व गोष्टींचे सुस्पष्ट प्रतिबिंब यंदाच्या विविध राज्यांच्या आणि विभागांच्या चित्ररथांतून उमटत होते. Kartavya Path हे सशक्त चित्रण नव्या भारताच्या उदयाचे द्योतक आहे. अयोध्येच्या देवदिवाळीपासून ते काश्मीरच्या अमरनाथपर्यंत, भारतीय जनमानसाच्या श्रद्धा केंद्रांचे असे ज्वलंत, प्रभावी चित्रण २६ जानेवारीच्या परेडमध्ये यापूर्वी कधीही घडले नव्हते. Kartavya Path आत्मसाक्षात्काराच्या, आत्मबोधाच्या या प्रवासासाठी लागलेला वेळ कमी की जास्त यावर तुम्ही वाद घालू शकता. तुमची इच्छा असेल तर पक्षीय राजकारण आणि विचारसरणीच्या आधारेही तुम्ही त्याचे विश्लेषण करू शकता. Kartavya Path परंतु याकडे केवळ याच मर्यादित, संकुचित दृष्टिकोनातून पाहणे ही गंभीर चूक ठरेल.
हे करत असताना झारखंड, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यात भाजपची सरकारे नाहीत हे लक्षात घ्यायला हवे. झारखंडच्या चित्ररथातील बाबा बैजनाथ, पश्चिम बंगालच्या चित्ररथातील दुर्गापूजा आणि तामिळनाडूच्या चित्ररथात अव्वैयार यांच्या मूर्तीसह असलेले तंजावरचे बृहदेश्वर मंदिर हे केवळ उगीच दाखवलेले नाही. Kartavya Path भारत निश्चितच बदलत आहे.यंदाच्या २६ जानेवारीच्या परेडमध्ये धुक्यामुळे हवाई दलाचा फ्लायपास्ट दरवर्षीप्रमाणे होऊ शकला नाही, हे खरे आहे. Kartavya Path पण विश्वास ठेवा, सर्व शंकाकुशंका, घातपात, कुचाळी, टिंगल टवाळी आणि षडयंत्राच्या ढगांच्या मागे एक आत्मविश्वासी, स्वावलंबी, धैर्यवान आणि समृद्ध भारताचा तेजस्वी सूर्य आपल्या दिव्य तेजाने जगाच्या पाठीवर झळकू लागला आहे.