बांगलादेशचा उल्लेख करत राकेश टिकैत यांच वादग्रस्त विधान, वाचा काय म्हणाले

नवी दिल्ली : शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मेरठमध्ये एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना बांगलादेशातील परिस्थितीचा उल्लेख करत एक वादग्रस्त विधान केले आहे. बांगलादेशात आंदोलकांनी जसे संसदेत घुसून सरकार उलथवून लावले, तशीच परिस्थिती भारतातही होईल.

टिकैत म्हणाले, बांगलादेशात जी व्यक्ती गेल्या 15 वर्षांपासून सत्तेत आहे, विरोधीपक्षाचे सर्व नेते कारागृहात बंद आहेत, तेव्हा अशीच परिस्थिती निर्माण होते. असेच येथेही होईल. हे तर त्या दिवशी जेव्हा ट्रॅक्टर घेऊन दिल्लीत गेले, तेव्हा त्यांची दिशाभूल करण्यात आली की लाल किल्ल्यावर चला. त्याच दिवशी संसदेकडे वळवले असते तर…,

त्या दिवशी 26 जानेवारी होती, नाही तर, 25 लाख लोक होते. त्याच दिवशी संपूर्ण प्रकरण निकाली निघाले असते. चूक झाली. “आता जनतेची तयारी आहे, चिंता करू नका. नक्की होणार. तयार आहोत.” टिकैत यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडिओ शेअर करत कारवाईची मागणीही केली आहे.