---Advertisement---

राखी सावंतच्या आईचे निधन! ब्रेन ट्यूमरशी झुंज अपयशी

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २९ जानेवारी २०२३। ब्रेन ट्यूमर आणि कॅन्सरसारख्या गंभीर आजारांनी ग्रस्त असलेली अभिनेत्री राखी सावंतच्या आई जया भेडा यांचे शनिवारी निधन झाले. त्याच्या जाण्याने राखी खुपचं दु:खी आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री आणि प्रसिद्ध मॉडेल राखी सावंतच्या आई जया भेडा यांचे निधन झाले आहे. मुंबईतील टाटा रुग्णालयात रात्री साडे आठच्या सुमारास जया भेडा-सावंत यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यात तिने आज माझ्या डोक्यावरून मायेचा हात गेला. आता माझ्याकडे गमावण्यासारखं काहीच उरलं नाही. अशी भावनिक पोस्ट राखीने लिहिली आहे. राखीच्या आईच्या पार्थिवावर अंधेरी पश्चिमेतील महापालिकेच्या ख्रिश्चन स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहे. बॉलीवूड मधील अनेक सेलेब्रिटीनी राखीच्या आईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

राखीने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये, राखी या एनजीओमधल्या मुलांना खाद्य पदार्थांचे वाटप करताना म्हणत होती, की माझ्या आईसाठी प्रार्थना करा. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. राखी सावंत हिची आई जया सावंत यांना कॅन्सरनंतर ब्रेन ट्युमरही झाला होता. दरम्यान आईवर उपचार सुरू असतानाच राखीने आपला दुबईतील प्रियकर अदिलबरोबर लग्न करून सर्वांना धक्का दिला होता.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment