निवडणुकींना घाबरू नका, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आपल्या सोबत : मंत्री गुलाबराव पाटील

---Advertisement---

 

नंदुरबार : सत्ता असो किंवा नसो शिवसेनेचा कार्यात कधीही खंड पडलेला नाही. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व अन्य कुठल्याही निवडणुका येऊ द्या. शिवसैनिकांनी काळजी करण्याचे काहीही कारण नाही. लाडक्या बहिणींच्या आशीर्वाद आपल्या सोबत आहे. तळोद्यात शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून न्यायदानाचे कार्य करण्यात येत असल्याचे गौरवोद्गार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढले.

तळोदा येथे शिवसेनेचा शिंदे गट तर्फे रक्षाबंधन निमित्त माळी समाज मंगल कार्यालयात शहरातील ५ हजार महिलांना भेट वस्तूंचे वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. ते म्हणाले, सर्वात जास्त भावाची काळजी घेणारी जात असेल तर ती बहीण आणि मुलगी आहे. जिथे पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री असतात तिथे सर्वजण काम करीत असतात. परंतु, तळोद्यातील शिवसैनिक कोरड्या नदीत नाव चालवत आहेत. शिवसेनेने शिवसैनिकांना 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण शिकवलं. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील काँग्रेसवर टीका करतांना म्हणाले, काँग्रेसने शिवसैनिकांवर अनेक गुन्हे दाखल करून त्रास देण्याच्या प्रयत्न केला.

शिवसेना संपर्कप्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, भविष्याचा काळात शिवसैनिकांनी संघटितपणे काम करायचे आहे. शहरातील प्रश्न सुटून आमच्या माता-भगिनींना न्याय मिळाला पाहिजे ही आमची एकमेव भूमिका आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने आमदारपद मिळाल्यानंतर दर शुक्रवारी शिवसेनेचा संपर्क कार्यालयात जनतेची प्रश्न सोडवण्याचा येतात. दुर्दैवाने शिवसेनेचा कार्यालयासह 200 लोकांना पालिकेने अतिक्रमणाची नोटीस दिली. अतिक्रमण काढण्याच्या प्रयत्न नगरपालिकेकडून करण्यात आला. परंतु, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या स्थगिती देऊन जनतेला दिलासा दिला. शहरातील बारगळ जहागीरदारीच्या प्रश्न सुटत नाही तोपर्यंत आपण स्वस्थ बसणार नाही.

आ.आमश्या पाडवी म्हणाले, लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना आर्थिक दिलासा मिळालेला आहे. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघात 1 लाख 5 हजार लाडक्या बहिण योजनेच्या लाभ घेत आहेत. वयोश्री योजनेत पूर्वी 500 रुपये मानधन मिळायचे आता 1500 रुपये लाभार्थ्यांना मिळत आहेत.

यावेळी जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी, माजी जि.प सदस्य विजय पराडके, जिल्हाप्रमुख गणेश पराडके, उपजिल्हाप्रमुख गौतम जैन, धडगाव नगरपंचायतीचे धनसिंग पावरा, महिला आघाडीच्या विभागीय समन्वयक सरिता कोल्हे- माळी, महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत, जिल्हा संपर्कप्रमुख कविता चौधरी, तालुकाप्रमुख अनुप उदासी, शिवसेना लोकसभा उपाध्यक्ष संदीप परदेशी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, माजी सभापती हितेंद्र क्षत्रिय, शहर संघटक सुरज माळी, शिवसेना पदाधिकारी ललित जाट, अमृतसिंग पावरा आदी उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---