Raksha Khadse : रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळाली आहे. विशेषतः रक्षा खडसे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागताच शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विम्याची रक्कम वर्ग झाली असून 2022 – 2023 अंतर्गत वादळीवारा व गारपीट नुकसानीचा लाभ थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे.
रावेर लोकसभा मतदारसंघातील 35 हजार 803 शेतकऱ्यांच्या खात्यात 130 कोटी रुपये पिक विम्याची रक्कम ही वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे पिक विम्यापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.