Bhusawal News : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव उत्साहात

---Advertisement---

 

भुसावळ, प्रतिनिधी : हम करे राष्ट्र आराधन या विचारधारेवर कार्यरत असलेल्या ‘राष्ट्र सेविका समिती’ या अखिल भारतीय महिला संघटनेला यावर्षी ८९ वर्षे पूर्ण होत असून, देशभरातील तसेच परदेशातील शाखांमधून विविध उपक्रमांच्या माध्यमातून संघटनेचे कार्य सातत्याने चालू आहे.

या पार्श्वभूमीवर रावेर लोकसभा क्षेत्र अंतर्गत राष्ट्र सेविका समिती भुसावळ शाखेतर्फे शस्त्रपूजन आणि विजयादशमी उत्सवाचे अहिल्यादेवी कन्या विद्यालय, जामनेर रोड, भुसावळ येथे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी प्रमुख अतिथी म्हणून तर विभाग बौद्धिक प्रमुख अनिता अनिल कुलकर्णी यांनी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

---Advertisement---

 

प्रारंभी सर्व सेविका भगिनींनी शहरामध्ये आकर्षक पथसंचलन केले. हिंदू संस्कृतीत शस्त्रपूजनाला विशेष महत्त्व आहे. असुरी वृत्तीवर विजय प्राप्त करून समाजात सद्वृत्तीचा प्रसार व्हावा, या उद्देशाने हा उत्सव दरवर्षी साजरा केला जातो. महिलांच्या संघटन, शौर्य, व आत्मविश्वासाच्या वृद्धीसाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी नमूद केले. याप्रसंगी सोहळ्यास भुसावळ परिसरातील सर्व सेविका भगिनीं मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---