Ram Mandir : निमंत्रणाबाबत शरद पवारांचं मोठं विधान; वाचा काय म्हणालेय ?

Sharad Pawar  : ज्या ठिकाणी पूजा-अर्चा होते तिथे मी फारसा जात नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. अमरावती येथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाबाबत त्यांना विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्या येथे रामललाची प्राणप्रतिष्ठापणा होणार असून राज्यात सध्या राम मंदिराच्या निमंत्रणाचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना रामललाच्या प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्याचे निमंत्रण नाही.

यातच शरद पवारांना हे निमंत्रण आहे असा प्रश्न त्यांना विचारला असता ते म्हणाले की, “राम मंदिराच्या उद्घाटनासाठी मला निमंत्रण दिले नाही. देव धर्म, पूजा-अर्चा या सगळ्यापासून मी बाजूला असतो. माझी एक दोन ठिकाणी काही श्रद्धास्थाने आहेत. तिथे मी जातो,” असे ते म्हणाले आहेत.