पाचोरा : अयोध्यात २२ जानेवारीला राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या अनुषंगाने पाचोरा शहरातील सर्व मद्य विक्री वा मांस विक्री दुकाने बंद ठेवावी, अशी मागणीचे निवेदन भाजपतर्फे बुधवार, १७ रोजी येथील पोलीस ठाण्यात देण्यात आले.
अयोध्या नगरीमध्ये ५०० वर्षाच्या संघर्षानंतर व न्यायालयीन लढाईनंतर प्रभू श्रीराम ललाची प्राणप्रतिष्ठा होत आहे. यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण असून ठिकठिकाणी मंदिरांना रंगोटी, लायटिंग, पताके, सजावट, कलश यात्रा, कीर्तने, अशा वेगवेगळ्या कारक अध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. या भक्तीमय वातावरणात 22 जानेवारी रोजी घरोघरी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पाचोरा शहर यांच्या माध्यमातून शहरातील सर्व मद्य विक्री दुकाने,बार आणि मांसविक्री करणारे सर्व दुकाने २२ जानेवारीला संपूर्ण दिवस बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी शहराध्यक्ष दिपक माने,जगदीश पाटील,समाधान मुळे,विष्णू अहिरे,स्वप्नील सोनार,योगेश ठाकूर,राहूल गायकवाड,विरेंद्र चौधरी,प्रदिप पाटील,मनीष भावसार,सोहन मोरे,गोकुळ दारकुंडे,आशिष जाधव,अमोल वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.