Ram Mandir : फोटोतून पहा अयोध्येतील श्रीराम मंदिराची उभारणी

Ram Mandir :  अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर निर्माणकार्य जोरात सुरु आहे. रामललाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरी सज्ज झाली आहे.

22 जानेवारी रोजी राम मंदिरात रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यासाठी हजारो भाविक अयोध्येत दाखल होणार आहे.

 

भाविकांची गैरसौय होऊन नये यासाठी श्रीराम जन्मभूमी ट्रस्टकडून विविध सोयी-सुविधा राबवल्या जात आहेत. (Image Source : PTI)

 

राम मंदिर परिसरात लहान-मोठ्या गोष्टींची विशेष काळजी घेतली जात आहे. भाविकांसाठी उपाययोजना आखण्यात येत आहे.

 

राम मंदिर परिसरात सांडपाणी आणि जलशुद्धीकरण संयंत्रे बसवण्यात आली असून यासह आत्मनिर्भर भारत योजनेवर भर दिला जात आहे.

 

राममंदिर परिसरात वृद्ध आणि दिव्यांग लोकांची ये-जा सुरळीत करण्यासाठीही सुविधा करण्यात येत आहे. या सर्व लोकांसाठी परिसरात अनेक विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सुरु आहे.

 

मंदिराच्या पश्चिमेला एक लिफ्ट आहे ज्या लिफ्टचा वापर वृद्ध दिव्यांग करू शकतात तर पूर्व दिशेला व्हील चेअर साठी दोन रॅम असतील

 

ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी सांगितलं की, राम मंदिर संकुलात वृद्ध आणि दिव्यांग यांच्यासाठी प्रवेशद्वारावर लिफ्टची सुविधा असेल.

 

राममंदिर संकुलाच्या 70 एकर जमिनीपैकी सुमारे 70 टक्के जमीन हरित क्षेत्र असेल. मंदिर परिसर ‘आत्मनिर्भर’ असेल, अशी माहिती ट्रस्टच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

भव्य राम मंदिरात 392 खांब असतील आणि 14 फूट रुंद, 732 मीटर लांब ‘परकोटा’ परिमिती असेल. प्राचीन काळात बाहेरील हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी शहराभोवती बांधलेली एक मजबूत भिंत बांधली जायची ज्याला ‘परकोटा’ असं म्हणत, यामध्ये प्रवेशासाठी दरवाजे होते.

राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी देशविदेशातील भाविक अयोध्येत दाखल होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी यांच्यासह मंत्री, दिग्गज नेते, कलाकार आणि सेलिब्रिटीदेखील उपस्थित राहणार आहेत.

 

अयोध्येमध्ये सध्या संतांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. देशभरातील हजारो संत राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्याला उपस्थित राहतील