Ram Mandir : राज्यभरात दुमदुमणार रामलल्लाचा जयघोष; अयोध्येतील भव्य दिव्य सोहळ्यासाठी भाजपची विशेष तयारी

 Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची प्रतीक्षा सध्या संपूर्ण भारतीयांना लागली आहे. त्यातच हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहे. अशातच महाराष्ट्रातील श्रीरामभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे.

अयोध्येतील राम मंदिरातीय जयघोष राज्यभरात दुमदुमणार आहे. भाजपने या सोहळ्यासाठी विशेष तयारी केली आहे. मुंबईतील भाजप कार्यालयात ७ दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे

१५ जानेवारी ते २२ जानेवारीला हे आयोजन करण्यात येणार असन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमांच उद्घाटन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज्यातील भाजप आमदार तसेच पदाधिकाऱ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती राहणार आहे.

राम मंदिर सोहळ्यासाठी भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर रामाची मोठी फ्रेम, राम मंदिराची प्रतिकृती आणि रोषणाई करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला अनुप जलोटा, अभिनेत्री दीपिका चिखलिया, अरुण गोविल यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे.

कसा असणार ७ दिवसीय सोहळा?

१७ जानेवारीला या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे.

१६ जानेवारीला सोमा घोष यांचा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.

१७ जानेवारीला संध्याकाळीअलका झा, सुरेश आनंद आणि घनश्याम जी यांचा भजनाचा कार्यक्रम असेल.

१८ जानेवारीला अनुप जलोटा यांचे भजन आणि संगीताचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.

२० जानेवारीला कार्यक्रमात रामायण मालिकेतील अभिनेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

२१ जानेवारीला कवी मनोज शुक्ला यांचा कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे.

२२ जानेवारीला पद्मश्री सुरेश वाडकर यांचे देखील कार्यक्रम ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण भाजपच्या सोशल मीडियावरून केले जाणार आहे.