---Advertisement---

Ramesh Bidhuri : दानिश अली यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य, भाजपने बजावली नोटीस

---Advertisement---

नवी दिल्ली : लोकसभेत बसप खासदार दानिश अली यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याच्या मुद्द्याने जोर पकडला आहे. आता भाजपने बिधुरी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पक्षाने त्यांच्यावर कोणतीही कारवाई का करू नये, अशी विचारणा नोटीसमध्ये करण्यात आली आहे.

रमेश बिधुरी दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. गुरुवारी लोकसभेच्या विशेष अधिवेशनादरम्यान भाजपचे खासदार रमेश बिधुरी यांनी आपले मत मांडताना बसपा खासदार दानिश अली यांच्याविरोधात असभ्य भाषा वापरल्याने ते चर्चेत आले.

विरोधी खासदारांचा गदारोळ आणि बिधुरी यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीदरम्यान भाजपने रमेश बिधुरी यांना असंसदीय भाषा वापरल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. भाजपने त्यांना १५ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. असंसदीय भाषा वापरल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई का करू नये, असा सवाल पक्षाने केला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment