स्वागत नववर्षाचे, करू या संकल्प, नव्या आशेसह ‘तरुण भारत लाईव्ह’ मध्ये रंगला काव्यकट्टा “व्हिडिओ”

जळगाव : ‘स्वागत नववर्षाचे’, ‘करू या संकल्प’, ‘नव्या आशेसह, ‘ये नववर्षा ये’ यासारख्या विविध कवितांनी ‘तरुण भारत लाईव्ह’चा साहित्य कट्टा रंगला होता. निमित्त होते नववर्षाचे आणि त्याच्या स्वागताचे. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झालेला आहे. या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत लाईव्ह’च्या साहित्य कट्ट्यामध्ये काव्यमैफिल घेण्यात आली.

‘तरुण भारत’चे निवासी संपादक चंद्रशेखर जोशी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागची भूमिका विशद केली. ‘तरुण भारत लाईव्ह’ विविध क्षेत्रातील मान्यवरांचे संवादात्मक कार्यक्रम घेत असतो. यातून त्या त्या क्षेत्रातील अपडेट माहिती वाचकांपर्यंत पोहचवत असल्याने त्यांनी सांगितले.

https://fb.watch/phfOXv-ibb/?mibextid=RtaFA8

यावेळी राज्य शासनाचा कवी केशवसूत पुरस्कार प्राप्त कवी शशिकांत हिंगोणेकर यांनी ‘ये नववर्षा ये’, मू.जे. महाविद्यालयाच्या प्रा.संध्या महाजन यांनी ‘संकल्प’, कला व वाणिज्य, विज्ञान महाविद्यालयातील प्रा.डॉ. सुषमा तायडे (अहिरे) यांनी ‘परिवर्तनाचा पाऊस’, खेडी येथील स्व. भीमराव देशमुख विद्यालयाच्या शिक्षिका पुष्पा साळवे यांनी ‘स्वागत नववर्षाचे’, जिल्हा परिषदेच्या कंडारे येथील शाळेच्या शिक्षिका ज्योती उत्तमराव वाघ यांनी ‘पहाट’, तर प्रकाश पाटील यांनी ‘मुलांनो अपसेट होऊ नका’ या कविता सादर केल्या. प्रास्ताविक व सूत्रसंचालन वरिष्ठ उपसंपादक रवींद्र मोराणकर यांनी केले, तर आभार उपसंपादक डॉ. पंकज पाटील यांनी मानले.