मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे माजी खासदार राहुल गांधी अडचणीत सापडले आहेत. आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी दि.२८ मार्च रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल माफी न मागितल्यास एफआयआर दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे.
रणजीत सावरकर म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करणार आहोत. तसेच राहुल यांनी सावरकरांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही त्यांनी त्यांचा अपमान केला आहे, असे ते म्हणाले.