---Advertisement---

रणवीरने मागितली पाकड्यांची माफी, पोस्ट पाहताच नेटकरी चांगलेच भडकले, म्हणाले, याला…

---Advertisement---

YouTuber Ranveer Allahabadia: युट्यूबर रणवीर अलाहबादिया हा नेहमी कोणत्या तरी कारणांवरून चर्चेत असतो. ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोमध्ये आईवडिलांबद्दल अश्लील प्रश्न विचारल्यानंतर रणवीर अलाहबादिया चांगलाच ट्रॉल झाला होता. या प्रकरणी त्याला तुरुंगातसुद्धा जावे लागले होते.

दरम्यान रणवीर हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. शनिवारी, भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर रणवीरने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये तो पाकिस्तानी नागरिकांची माफी मागताना दिसला. त्यामुळे रणवीरला पुन्हा एकदा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

रणवीर अल्लाहबादियाने १० मे रोजी त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. त्याच्या पोस्टमध्ये तो लिहतो, ‘प्रिय पाकिस्तानी बंधूंनो आणि भगिनींनो, या पोस्टसाठी मला अनेक भारतीयांकडून द्वेष मिळेल, परंतु हे सांगणे आवश्यक आहे. अनेक भारतीयांप्रमाणे, माझ्या मनातही तुमच्याबद्दल द्वेष नाही. आपल्यापैकी अनेकांना शांती हवी असते. जेव्हा जेव्हा आपण पाकिस्तानी लोकांना भेटतो तेव्हा तुम्ही नेहमीच प्रेमाने आमचे स्वागत करता. पण तुमचा देश सरकार चालवत नाही. तो तुमच्या सैन्याने आणि तुमच्या गुप्तहेर (ISI) चालवला आहे. पाकिस्तानी नागरिक या दोन्ही गोष्टींपेक्षा खूप वेगळा आहे. पाकिस्तानी त्याच्या हृदयात शांती आणि समृद्धीची स्वप्ने पाहतो. स्वातंत्र्यापासून या दोन शक्तींनी तुमच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान केले आहे.’

रणवीर इलाहाबादिया ने मांगी पाकिस्तानियों से माफी, तो बुरी तरह भड़के यूजर्स, बोले - ‘वहीं चले जाओ’

रणवीर पुढे म्हणाला, ‘जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही द्वेष पसरवत आहोत, तर मी मनापासून माफी मागतो.’ पाकिस्तानी लोकांना भेटणारे भारतीय तुमचा मुद्दा समजतात, पण सध्या भारतीय आणि पाकिस्तानी दोन्ही माध्यमे (वृत्तवाहिन्या) खोटेपणा पसरवत आहेत. आपल्यातील बहुतेक लोक सीमेजवळील निष्पापांसाठी शांतता हवी आहेत, परंतु भारताला पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा दहशतवाद देखील संपवायचा आहे. रणवीरच्या या पोस्टवर नेटकरी चांगलेच भडकले आहेत.

या पोस्टवर लोक टीका करत आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले की, ‘तू तुरुंगात ठीक होता.’ दुसऱ्याने लिहिले की, ‘तू पाकिस्तानातच राहायला हवे’ मात्र, वाद वाढत असल्याचे पाहून रणवीरने ही पोस्ट डिलीट केली आहे. पण त्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment