जळगाव : जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यात अल्पवयीन मुलगी व एका २५ वर्षीय महिलेचा हात पकडून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
जळगाव शहरातील एका भागात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. बुधवार, १९ रोजी रात्री ८.३० वाजता यशवंत अहिरे (२० रा. जळगाव) हा पीडितेच्या घरात घुसला. त्यानंतर तिचा हात पकडत ‘तू मेरी जिंदगी है’, म्हणून अश्लिल चाळे केले. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी शनीपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार यशवंत अहिरे याच्यावर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय मराठे हे करीत आहे.
महिलेचा हात पकडून विनयभंग
भुसावळ तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बकऱ्या चारून आपला उदरनिर्वाह करते. बुधवार, १९ रोजी सकाळी ८.३० वाजता पीडित महिला आपल्या बकऱ्या घेवून आसरा माता मंदीर परिसरात आलेली होती. त्यावेळी गावात राहणारा अजय पाटील याने महिलेसोबत अश्लिल कृत्य करत तिचा हात पकडून विनयभंग केला. पिडीत महिलेने वरणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अजय कैलास पाटील याच्या विरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक अन्नपुर्णा सिंह ह्या करीत आहे.