Rashid Khan : भूकंपग्रस्तांसाठी घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : अफगाणिस्तानातील हेरात प्रांताच्या राजधानीच्या वायव्येस ३० किमी अंतरावरील भागांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, या धक्क्यामुळे तब्बल २ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यु झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खानने मोठा निर्णय घेतला.

राशिद खानने अफगाणिस्तानच्या पश्चिमेकडील प्रांतांमध्ये ज्यात प्रामुख्याने हेरात, फराह आणि बादघिस यांना भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपावर राशिदने आपल्या भावना व्यक्त केल्या असून तो म्हणाला, भूकंप झाल्याचे ऐकून मला फार वाईट वाटले. तसेच, भूकंपग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी क्रिकेट विश्वचषक २०२३ च्या सर्व सामन्यांचे मानधन दान करण्याचे त्याने जाहीर केले.

दरम्यान, राशिदने पुढे म्हटले की, लवकरच आम्ही एक फंड रेसिंग अभियान सुरू करणार आहोत, ज्याद्वारे त्या सर्व लोकांना मदत मिळेल असे त्याने सांगितले. अफगाणिस्तानमध्ये ६.३ रिश्टल स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंपचा धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता इतकी भीषण होती की, यामुळे तब्बल २ हजार जणांचा मृत्यु झाला आहे. दरम्यान, या शक्तिशाली भूकंपामुळे अफगाणिस्तानातील ग्रामीण घरे उध्वस्त झाली तर भूकंपाने भयग्रस्त झाल्याने शहरातील नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली.

दरम्यान, भूकंपाच्या धक्क्यामुळे उध्वस्त झालेल्या गावांतील घरांमध्ये वाचलेल्यांना शोधण्यात येत असून यात प्रामुख्याने हेरात प्रांताच्या राजधानीच्या वायव्येस ३० किमी अंतरावरील भागांना भूकंपाचा धक्का बसला आहे. असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, देशाच्या राष्ट्रीय आपत्ती प्राधिकरणाने सांगितले की, पश्चिम अफगाणिस्तानमध्ये तीव्र आफ्टरशॉक आणि त्यानंतर आलेल्या शक्तिशाली ६.३ तीव्रतेच्या भूकंपामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे.