---Advertisement---
भुसावळ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांचे रविवारी पहाटे साडेसहा वाजता नवजीवन एक्स्प्रेसने भुसावळ रेल्वे स्थानकावर आगमन झाल्यानंतर प्रचंड बंदोबस्तात ते मुक्ताईनगरमार्गे बर्हाणपूरकडे रवाना झाले. भागवत यांच्या आगमनप्रसंगी स्थानिक पोलिसांनी काटेकोर बंदोबस्त राखला होता शिवाय शनिवारी बंदोबस्ताची रंगीत तालीमही घेण्यात आली.
पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वात रेल्वे स्थानकापासून बर्हाणपूरपर्यंत कॅन्व्हॉय पुरवण्यात आला. यावेळी गांधी पुतळा, वाय पॉईंटपासून पुढे टप्प्या-टप्प्याने वाहतूक थांबवण्यात आली होती. बर्हाणपूर येथे आयोजित तीन दिवस कार्यक्रमाला भागवत सहभागी होणार आहेत.