---Advertisement---
नंदुरबार : वाकी (ता.शहादा) नदीवर बांधण्यात आलेला दरा प्रकल्प ओवर फ्लो झाला आहे. त्यामुळे सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. पर्यटकांनी आणि नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरा प्रकल्प परिसरात असलेली हिरवळ आणि वनीकरण विभागाने जगवलेले जंगल यासह विविध नैसर्गिक सौंदर्याचा उधाण करणाऱ्या बाबी या परिसरात असल्याने मोठ्या प्रमाणात शहादा तालुक्यासह जिल्हाभरातील पर्यटक दरा प्रकल्पाला भेट देतात. यावर्षी दरा प्रकल्प लवकरच ओव्हर फ्लो झाला असून धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
वाढत्या पावसाच्या अंदाज लक्षात घेता पाण्याच्या विसर्ग अजून वाढणार असल्याने पर्यटकांनी आणि नदीकाठावरील गावातील नागरिकांनी नदीपात्रात जाऊ नये असे आवाहन शहादा तहसील कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. येत्या काळात धरणातील विसर्गाचे प्रमाण वाढणार असल्याचा अंदाज ही व्यक्त केला गेला आहे.









