---Advertisement---

गौरी गणपती आणि दिवाळीत मिळणार 100 रुपयांत आनंदाचा शिधा

---Advertisement---

मुंबई : दिवाळीप्रमाणेच गौरी गणपती, दिवाळीसाठी राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’ (Anandacha Shidha) देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार या शिधापत्रिकाधारकांना 100 रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येणार आहे.

राज्य मंत्रिमंडळाच्या (Maharashtra Cabinet Decision) बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने महाराष्ट्र कॅसिनो कायदा देखील रद्द करण्यात आला आहे. राज्यातील 17 जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवणार आहे. यासाठी पाच हजार कोटीचा प्रस्ताव आहे. तसेच आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ करण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाने घेतलेले ९ महत्त्वाचे निर्णय

  1. राज्यातील १७ जिल्ह्यांतील सर्व आदिवासी वाडे, पाडे आता मुख्य रस्त्याने जोडणार . भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबविणार. ५ हजार कोटीचा प्रस्ताव (आदिवासी विकास विभाग)
  2. गौरी गणपती, दिवाळीसाठी १०० रुपयात आनंदाचा शिधा. प्रत्येकी एक किलोचा रवा, चणाडाळ, साखर, खाद्यतेल असा शिधा (अन्न व नागरी पुरवठा)
  3. आयटीआयमधील शिल्प कारागीर प्रशिक्षणार्थीना विद्यावेतनात भरीव वाढ. आता दरमहा ५०० रुपये मिळणार (कौशल्य विकास )
  4. मुंबई प्रेस क्लबला फोर्ट येथे पुनर्विकासासाठी परवानगी ( महसूल विभाग)
  5. महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द (गृह विभाग )
  6. केंद्राच्या सूचनांप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम. राज्याचा हिस्सा वाढला (महिला व बाल विकास)
  7. सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे ( सहकार विभाग )
  8. दुय्यम न्यायालयातील निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन (विधी व न्याय विभाग )
  9. मंडणगड येथे दिवाणी न्यायालय (विधी व न्याय विभाग)

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment