Raver : वापरलेल्या युनिट प्रमाणे विज बिल द्यावे : रावेर तालुका पिठ गिरणी मालक कामगार संघ

Raver :   पिठ गिरणीसाठी वापरलेल्या युनिट प्रमाणे विज बिल  देण्यात यावे. युनीट दरापेक्षा जादा इतर  स्थिर आकार, इंधन अधिभार, वहन आकार  बिलात लावू नये अशी मागणी  गिरणी मालक व कामगार महासंघाने रावेर येथील महावितरण कंपनीचे उप अभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.

रावेर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात उप अभियंता यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की,  पीठ मसाला, पापड गिरणी मालक व कामगारांना विजेची बिले मराठीतून मिळावी. वापरलेल्या युनिट दरापेक्षा जादा इतर आकार लावू नये, उदा. स्थिर आकार, इंधन अधिभार, वहन आकार वगैरे. वीज बीले देय तारखेच्या कमीत कमी चार दिवस अगोदर मिळावीत. घरघंटी (मिनी गिरणी) बाहेरील दळण दळून  धंदा व्यवसाय  करीत असतील तर त्यांना व्यावसायिक पध्दतीने विज दर आकारावे.  गिरणीची विज बिलाची औद्ययोगिक बिलानुसार आकारणी केली जात असल्याने इतर उद्योगाप्रमाणे २४ तास विज पुरवठा व्हावा.

पीठ मसाला, पापड गिरणीसाठी नवी कनेक्शन देतांना जिल्हा उद्योग केंद्राचा दाखला असल्याशिवाय नवीन कनेक्शन देऊ नये. पीठ मसाला, पापड गिरणी विज ग्राहकांच्या कामगारांच्या कुटूंबासह विमा संरक्षण मिळावे. विज मंहळाकडे भरलेल्या अनामत रकमेवर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज मिळावे व वर्षातून एखाद्या महिन्याच्या बिलात तसे नमूद करावे.आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

 

अन्यथा पिठ गिरणी मालक विज कनेक्शन कट करणार

घरघंटी (मिनी गिरणी) बाहेरील दळण दळून  धंदा व्यवसाय  करीत असतील तर त्यांना व्यावसायिक पध्दतीने विज दर आकारावे. विज मंडळाकडून घरघंटी (मिनी गिरणी) यांच्यावर कारवाई करावी. अन्यथा रावेर तालुक्यातील सर्व पीठ मसाला पापड गिरणी मालक आपल्या गिरणीचे विज कनेक्शन कट करण्याचा अर्ज विजवितरण कंपनीकडे  करतील.  अशा इशारा रावेर पिठ गिरणी मालक संघाने दिला आहे.

 

यांची होती उपस्थिती

यावेळी राज्य निरंकार सेवा पीठ मसाला पापड भात गिरणी मालक व कामगार महासंघाचे अध्यक्ष अशोक सोनवणे,   रावेर तालुकाध्यक्ष महेंद्र दालिया,कार्याध्यक्ष प्रविण पाटील, उपाध्यक्ष विनोदी महाजन ,सचिव पवन पाटील,सह सचिव सुधीर भंगाळे, कोषाध्यक्ष नयन महाजन,शहराध्यक्ष सारंगधर बारी, उपाध्यक्ष हबीब शेख, कुसुम पाटील, जया महाजन, योगेश कोळंबे, विनोद झोपे, तुषार नेमाडे, पुरुषोत्तम पाटील, दत्तात्रय कानडे उपस्थित होते.