रावेर : शहरासह तालुक्यात वेगवेगळ्या दोन घटनेत महिलेसह पुरूषाने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. पहिल्या घटनेत रावेर शहरातील प्राजक्ता भरतकुमार पाटील (उमरेडा, जि.नागपूर, ह.मु.वासुदेव नगर, विद्या नगरजवळ रावेर) यांनी गुरुवारी गळफास घेतला. रावेर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. रावेर शहरातील वासुदेव नगरातील रहिवासी सीताराम काशिनाथ पाटील यांची कन्या प्राजक्ताचे उमरेड येथील भरतकुमार पाटील याच्याशी विवाह झाला होता. विवाहिता माहेरी आल्यानंतर आई-वडील चिनावल येथे गेल्यानंतर विवाहितेने घराच्या वरच्या मजल्यावरील बेडरुमधील छताच्या लोखंडी कडीला साडीने गळफास घेतला. गुरुवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी डीवायएसपी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कैलास नागरे, एपीआय शितलकुमार नाईक, उपनिरीक्षक दीपाली पाटील, विशाल सोनवणे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.
केर्हाळा येथे एकाची गळफास घेऊन आत्महत्या
रावेर तालुक्यातील केर्हाळा बुद्रूक येथील संदीप सीताराम बावीस्कर (35) याने बुधवारी रात्री दारूच्या नशेत घराच्या मागील भागात असलेल्या शौचालयाच्या लोखंडी गजाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. मुरलीधर बाविस्कर यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुनील वंजारी पुढील तपास करीत आहे.