---Advertisement---

Raver Lok Sabha : खासदार रक्षा खडसेंचा श्रीराम पाटलांना टोला; म्हणाल्या ‘फक्त तिकिटासाठी…’

---Advertisement---

रावेर : रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे उद्योगपती श्रीराम पाटील यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मात्र, या उमेदवारीवरून पक्षातील पदाधिकाऱ्यांची नाराजी पाहायला मिळत आहेत. शुक्रवार, 12 रोजी शेकडो स्थानिक एकनिष्ठ पदाधिकार्‍यांनी आपापल्या पदांचे राजीनामे दिले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी वरून श्रीराम पाटलांना टोला लगावला आहे.

खासदार रक्षा खडसेंचा श्रीराम पाटलांना टोला
खासदार रक्षा खडसे यांनी उमेदवारी वरून श्रीराम पाटलांना टोला लगावला आहे. त्या म्हणाल्या की, श्रीराम पाटील कोण आहेत हे सर्वांना माहित आहेत. काय उद्देशाने ते पक्षात गेले, कशी उमेदवारी मिळाली, हे जनतेला माहित आहे.

मागच्या महिन्यात ते भाजपमध्ये होते. त्याच्या आधीच्या महिन्यात अजित दादांच्या पक्षात होते. आता लगेच तिसऱ्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात गेले. फक्त तिकिटासाठी निवड पक्ष बदलायचं असेल तर ती वृत्ती आमची तर नाही, असे म्हणत खासदार रक्षा खडसे यांनी श्रीराम पाटलांना टोला लगावला.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment